Atal Pension Yojana-अटल पेंशन योजना.

Atal Pension Yojana All Information Available Here

Atal Pension Yojana

अटल पेन्शन योजना पूर्ण माहिती

Atal Pension Yojana Details Apply Online – मित्रांनो, जितक्या लवकर तुम्ही अटल पेन्शन योजनेत  सहभागी व्हाल, तितका अधिक फायदा आपल्याला मिळेल. समजा, जर एखादा व्यक्ती वयाच्या 18 वर्षी या योजनेत सहभागी झाली तर त्यास वयाच्या 60 वर्षांनंतर 5000 रुपये पेन्शन मिळू शकते, मात्र यासाठी संबंधित व्यक्तीस दरमहिना 210 रुपये या योजनेत जमा करणं आवश्यक आहे. म्हणजेच दररोज तुम्ही जर 7 रुपये जमा केले तर तुम्हाला 60 वर्षांनंतर दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळू शकेल. जर तुम्ही दर महिन्याला 42 रुपये जमा केले तर तुम्हाला दरमहा 1000 रुपये पेन्शन मिळेल. त्याचप्रमाणे 2000 रुपये पेन्शनसाठी 84 रुपये, 3000 रुपयांसाठी 126 रुपये, 4000 रुपये पेन्शनसाठी दरमहा 168 रुपये जमा करावे लागतील.

अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) ही असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आली होती. परंतु, आता ज्यांचे पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) अकाऊंट आहे, असे 18 ते 40 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करुन पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. या योजनेतून रक्कम जमा करणाऱ्या व्यक्तीस वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागेल. अटल योजनेतील पेन्शनची रक्कम ही तुम्ही गुंतवणूक (Investment) केलेल्या रकमेवर आणि वयावर (Age) अवलंबून असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.