MHT CET 2022 प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु

MHT CET 2022-23 Registration Starts

MHT CET 2022 Online Application Starts

MHT CET 2022 Exam : Application process for Maharashtra Common Entrance Exam has started. Candidates who want to sit for this exam can apply till March 31, 2022. Candidates can apply by going to the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

MHT CET 2022: Entrance Examination for Admission to Professional Courses in Bachelor of Engineering (B.E/B.Tech.),Bachelor of Agriculture (B.Sc Agri) and Bachelor of Pharmacy (B.pharm) through State Common Entrance Test Cell, Mumbai for the academic year 2022-23 will be held at the various examination centers within Maharashtra State.

MHT CET 2022 Notification

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (MHT CET Cell) विविध उच्च शिक्षणातील इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी इत्यादी विषयातील अंडर-ग्रॅज्युएट (UG) आणि पोस्ट-ग्रॅज्युएट (PG) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते. महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 2022 (MHT CET 2022) साठी नोंदणीची प्रक्रिया 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 31 मार्च ही एमएचटी सीईटी 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

  • एमएचटी सीईटी 2022 ऑनलाईन परिक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एच.एस.सी. किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा 12वी/समकक्ष परीक्षा दिलेली असावी.
  • संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विशेष मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे.
  • दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान 40 टक्के किंवा अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • एमएचटी सीईटी 2022 शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.800/-
  • महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग / आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग / महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग उमेदवार) रु. 600/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 31 मार्च

पात्रता: 

  • बारावी उत्तीर्ण (विज्ञान शाखा)

अर्ज शुल्क(Fee): (PCM or PCB)

  • मागासवर्ग -600/-
  • सर्वसाधारण-800/-

How to Register MHT CET 2022

  1. महाराष्ट्र सीईटी 2022 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जा.
  2. एमएचटी सीईटी 2022 ऑनलाइन नोंदणी लिंकवर क्लिक करा.
  3. नवीन पेजवर ‘New Registration’ वर क्लिक करा.
  4. मागितलेले तपशील भरून नोंदणी करा आणि अर्ज सबमिट करा.
  5. महाराष्ट्र CET 2022 नोंदणी करण्यासाठी उमेदवारांना 800 रुपये शुल्क भरा. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्कात सवलत दिली जाईल.
  6. शुल्क भरल्यानंतर उमेदवारांनी सबमिट केलेल्या अर्जाची सॉफ्ट कॉपी सेव्ह करा.

 

MHT CET 2022 साठी महत्वाचे निर्देश

  • उमेदवार बारावी (बारावी/समकक्ष परीक्षा) उत्तीर्ण किंवा परीक्षा देत असावा.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडे संबंधित वैध प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे.
  • MHT CET 2022 च्या नोंदणीसाठी उमेदवारांनी त्यांचा सक्रिय ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरावा.
  • सीईटी आणि केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवाराकडे त्याचा/तिचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक सक्रिय असणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराने अंतिम सबमिशन आणि पेमेंट करण्यापूर्वी अर्ज पडताळून पाहणे आवश्यक आहे.
  • सबमिट केलेला अर्ज आणि भरलेले शुल्क परत केले जाणार नाही. त्यामुळे पैसे भरण्यापूर्वी तपशील पडताळून पाहा.
  • प्रमाणपत्रासाठी फोटो, सही यांची चांगली क्वालिटी अपलोड करा.
Leave A Reply

Your email address will not be published.