TET Exam Result Declared
टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर, १६ हजार ५९२ उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र
TET Exam Result Declared
TET Exam Result Declared : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर केला आहे. १६ हजार ५९२ उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले आहेत. यंदा परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदाचा निकाल कमी असला तरी गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे.